Shri Sadguru Satam Maharaj
 1. चमत्कार जो सांगतो देव सगळीकडे आहे

  देवबागचे श्रीकृष्ण डिंगे हे श्री साटम महाराजांचे भक्त. ते अनेकदा महाराजांच्या भेटीसाठी दाणोलीला जात असत त्याचप्रमाणे इतर धर्मस्थानीही जात असत. श्री महाराज त्यांना प्रेमाने शिवराम म्हणून हाक मारत असत. एक दिवस महाराज त्यांना म्हणाले की. ते देवाच्या शोधात विनाकारण इकडे तिकडे फिरत होते. ते पुढे म्हणाले की देव सगळीकडे असल्यामुळे त्याने हाक मारली तर तो कधीही त्यांच्यापुढे येऊ शकतो. ह्यावर शिवरामने विचारले की देव त्याच्या सारख्या सामान्य माणसासमोर कसा येईल म्हणून तो वेगवेगळ्या तीर्थस्थानी जाऊन स्वत:ला शुद्ध करत होता. गंगेत न्हाऊन स्वत:ला शुद्ध करत होता. शिवरामने हे म्हणताच महाराजांनी पाय पुढे केले व म्हणाले ही पहा गंगा आणि खरोखर त्यांच्या पायातून पाणी वाहू लागले. महाराज शिवरामला म्हणाले ही बघ गंगा इथे आहे. सर्वांना महाराजांच्या पायातून वहाणारी गंगा बघून आनंद झाला आणि ते पाणी गोळा करण्याकरीता त्यांना एकच गर्दी केली. शिवराम महाराजांच्या पाया पडला व त्याच्या डोळ्यात अश्रु आले होते.

 2. चमत्कार हे दाखविण्यासाठी की विश्र्वास सर्व दुखणे बरे करू शकतो

  दाजीबा बोंगार ह्याला कोड झाला होता. त्याने अनेक औषधे केली, डॉक्टरांचा सल्ला घेतला पण सर्वांचे म्हणणे पडले की, त्यांचा कोड बरा होणार नाही. दाजीबांनी खचून जाऊन आत्महत्या करण्याचा विचार केला पण मित्रांचे म्हणणे ऐकून ते श्री साटम महाराजांना भेटायला गेले. महाराजांसमोर बरे होण्याच्या अपेक्षेने पूर्ण समर्पण केले. महाराजांनी त्याला बोटांवर एक खास प्रकारचे तेल लावायला सांगितले. त्यांच्यावर विश्र्वास ठेऊन दाजीबांनी ते तेल लावले. थोड्याच दिवसांत त्यांच्या बोटावरचा रोग कमी होऊ लागला व काही दिवसांत कोड पूर्णपणे बरा झाला. दाजीबांनी महाराजांचे आभार मानले व त्यांचा भक्त झाला.

 3. चमत्कार हे सिद्ध करायला की श्री साटम महाराजांना आपल्या भक्तांची काळजी आहे व त्यांच्यावर ठेवलेला विश्र्वास ते खरा करतात

  पांडुरंग दाडकर हे बापूसाहेब सरकारांबरोबर काम करीत होते. बापूसाहेब दाडेकरांच्या कामावर खुष होते. ते दाडकरांना आपल्या बरोबर श्री साटम महाराजांच्या भेटीला नेत होते. त्यांना महाराजांच्या दर्शनाचा लाभ व्हायचा व काही दिवसांत दाडकर सुद्धा महाराजांचे भक्त झाले. बऱ्याचदा ते महाराजांच्या तसबिरीकडे एकटक बघत बसायचे. सावंतवाडीला आलेल्या मलेरियाच्या साथीने दाडकरांना गाठले. बरेच औषधोपचार करुनही त्यांच्या प्रकृतीत बदल नव्हता. एक महिन्यापेक्षा जास्त झाला होता. त्यांना कोठेही बाहेर जाता येत नव्हते त्यामुळे त्यांना महाराजांचे दर्शनही करता येत नव्हते. ते महाराजांच्या दर्शनाकरीता अस्वस्थ होत होते. एक दिवशी महाराज त्यांच्या स्वप्नात आले व मालवणी भाषेत त्यांना म्हणाले तुझ्या उशाखाली मी राख आणि एक गोळी ठेवली आहे, ती घे तू बरा होशील. घाम फुटून दाडकर जागे झाले, त्यांनी ती राख उचलली आणि सांगितल्याप्रमाणे गोळी घेतली. त्यांच्या बायकोला गोळी विष असल्याची चिंता वाटली पण तिची चिंता दूर झाली जेव्हा दाडकरांनी तिला आपल्या स्वप्नाबद्दल सांगितले. अशारितीने दाडकरांचा आजार बरा झाला.

 4. चमत्कार ज्यातून श्री साटम महाजराजांची वाईट आत्मे नष्ट करण्याची शक्ती दिसून येते

  सबनीस हे बापूसाहेबांबरोबर काम करायचे. बापूसाहेबांनी त्यांची भेट श्री साटम महाराजंाशी करून दिली. त्यानंतर सबनीस महाराजांचे भक्त झाले. सबनीसांकडे पैसा व संपत्ती भरपूर होती पण तरीही ते व त्यांची बायको दु:खी होते कारण त्यांना मूलबाळ नव्हते. त्यांनी ह्यातून मार्ग काढण्यासाठी श्री महाराजांची मदत घ्यायचे ठरविले. श्री सबनीसांनी महाराजांना आपल्या घरी येण्याचा आग्रह केला, बऱ्याच आग्रहानंतर त्यांच्या घरी आले. सबनीसांनी महाराजांना सर्व हकीकत सांगितली. अचानक महाराजांना खूप राग आला. रागाच्या भरात त्यांनी अंगणातल्या पिंपळाच्या झाडाकडे बघितले त्याबरोबर त्या झाडाला आग लागली व ते भस्म झाले. त्या झाडावर बसलेला असूर देखील त्या आगीत भस्म झाला. त्या असुरामुळे कोणतेही बाळ त्या घरात जगत नव्हते. त्यानंतर काही दिवसांनी सबनीस जोडप्याला मूल झाले.

 5. चमत्कार हे दाखविण्यासाठी की महाराजांसमोर पदाचे महत्त्व नाही

  श्री साटम महाराजांची सवय होती की कधीकधी ते दाणोलीच्या आसपासच्या गावात नागडे फिरायचे. त्यांना लोक चिडवायचे पण महाराज त्याकडे लक्ष द्यायचे नाही. एकदा असेच फिरताना एका घरात त्यांना पायऱ्यांवर बसलेला एक मुलगा दिसला. तो मुलगा एका पोलीसाचा भाचा होता. त्या पोलीस इन्स्पेक्टर व त्याच्या बायकोला मूल नव्हते. महाराजांना बघताच तो मुलगा ओरडायला लागला. त्याचे ओरडणे ऐकून त्याची मावशी बाहेर आली. त्याची मावशी स्वयंपाकघरात दूध तापवीत होती. तिने महाराजांना ओळखले व त्यांच्या पाया पडली. महाराजांनी तिला घरात उकळणारे दूध त्यांना पिण्याकरीता आणण्यास सांगितले. तिने एका पेल्यात दूध आणले आणि महाराजांना प्यायला दिले. घरात दूध तापत ठेवले आहे हे त्यांना कसे कळले हे मात्र तिला कळेना. एका घोटात महाराजांनी ते दूध संपविले. त्याचवेळी तो इन्स्पेक्टर घरी परत आला. त्याला तो नागडा माणूस बघून खूप राग आला. त्याने त्याला ताबडतोब तिथून निघून जायला सांगितले. पण महाराजांनी त्याला काही उत्तर दिले नाही. इन्स्पेक्टरला राग आला, त्याने रागाच्या भरात त्याने एक लाकडाची फळी उचलली आणि त्या नागड्या माणसाला म्हणजेच महाराजांना मारायला गेला. पण त्याआधीच महाराजांनी स्वत:भोवती एक वर्तुळ काढले आणि त्याक्षणी तो इन्स्पेक्टर पुतळ्यासारखा स्थीर झाला. एक हात वर उचलून धरल्यासारखा. त्या बाईने हा सर्व प्रकार बघितला व नवऱ्याची चूक कळताच महाराजांची माफी मागितली. महाराजांनी उलट्या दिशेने आपल्याभोवती एक वर्तुख काढले. त्याबरोबर तो इन्स्पेक्टर पुन्हा आपल्या पूर्वस्थितीत आला. महाराजांची ओळख त्याला पटली व त्याने त्यांची क्षमा मागितली. महाराजांना त्यांचा पश्चात्ताप बघून बरे वाटले, त्यांनी त्या दोघांना मूल होण्याचा आशिर्वाद दिला व काही दिवसांतच त्यांना मूल झाले. त्याप्रसंगानंतर तो इन्स्पेक्टर महाराजांचा भक्त झाला.

 6. चमत्कार हे दाखविण्यासाठी की महाराज खूप दयाळू आहेत

  सहदेव कोचरेकरांना कायम डोकेदुखीचा त्रास होता. औषधांवर त्यांनी खूप पैसा खर्च केला परंतु गुण येत नसल्याने शेवटी त्यांनी या डोकेदुखीतून बरे होण्याची अशा सोडली. त्यांच्या एका मित्राने श्री साटम महाराजांचे नांव सुचविले. गमतीत त्या मित्राने कोचरेकरांना एक ब्रॅंडीची बाटली स्वत:जवळ ठेवायला सांगितली. कोचरेकरांनी महाराजांना नमस्कार करताच महाराजांनी खिशात असलेली ब्रॅंडीची बाटली मागितली. कोचरेकरांना आश्र्चर्य वाटले की ही गोष्ट न सांगताच महाराजांना कशी कळली. त्यांनी ती बाटली महारजांना दिली, त्याबरोबर महाराजांनी ती बाटली कोचरेकरांच्या डोक्यावर फोडली. कोचरेकरांना इजा तर झालीच पण धक्काही बसला की महाराजांनी असे का केले? थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात आले की, त्यांची डोकेदुखी पूर्णपणे नाहीशी झाली होती. मार लागल्यामुळे झालेली इजा देखील बरी झाली होती.


मागे
पुढे

वर