Shri Sadguru Satam Maharaj
होम
  1. चमत्कार हे दाखविण्यासाठी की महाराज भक्ताच्या पुजलेल्या देवाच्या रुपात त्याच्या समोर येऊ शकतात

    सावंतवाडीचा एक हातगाडीवाला विठ्ठलाचा परमभक्त. दरवर्षी आषाढी एकादशीला तो दिंडीत पंढरपूरला जायचा. एकदा विठ्ठलाचे दर्शन घेऊन परत येत असताना त्याला पटकी (कॉलरा) झाला. तो आजार इतका भयंकर झाला की, तो जवळजवळ बेशुद्ध झाला. त्याच्या बरोबरचे त्याचे सोबती त्याला ह्या अवस्थेत सोडून परत जायला निघाले. तो हातगाडीवाला जेव्हा जेव्हा शुद्धीवर यायचा तेव्हा तेव्हा तो प्रार्थना करायचा की, हे देवा मला अशा परावलंबी परिस्थितीत का टाकले आहेस. मी मेलो तर माझ्या कुटुंबाचा सांभाळ कोण करणार. मला जर मृत्यु यायचाच असेल तर इतरांवर अवलंबून ठेऊ नको. तो झोपला असताना त्याच्या स्वप्नात एक साधू आला व म्हणाला मित्रा तु झोपला का आहेस? उठ! तुझ्या साथीदारांनी तुला सोडले, परंतु तु काळजी करू नकोस. तुला भूक लागली आहे. मी डाळ भाताची व्यवस्था केली आहे तुझ्यासाठी, उठ आता! असे म्हणून हळूच त्या साधूने त्याला स्वप्नातून जागे केले. डोळे उघडताच तो साधू नाहीसा झाला. परंतु गाडीवाल्याला अंगात ताकद वाटली व तो चालू शकत होता. पंढरपूर सोडायच्या आगोदर पुन्हा एकदा त्याने विठ्ठलाचे दर्शन घेतले. परतीच्या वेळी अंबोली गावात एका धर्मशाळेत तो थांबला. त्याला कोणी तरी हाक मारली आणि आश्र्चर्य म्हणजे हा तोच साधू होता जो त्याच्या स्वप्नात आला होता. गाडीवाल्याने त्या साधूचे पाय धरले. साधूने त्याला मिठीत घेतले व म्हणाला तू बरेच दिवस जेवला नाही आहेस. तुझ्याकरीता डाळ भाताची व्यवस्था मी केली आहे. माझ्याबरोबर तू खायला चल! ते दोघे धर्मशाळेत आले तिथे एक मेंढपाळ त्यांची वाट बघत होता. साधूच्या पाया पडून तो म्हणाला महाराज आज तुम्ही माझ्या बायकोच्या स्वप्नात येऊन तिला डाळ भात बनवायला सांगितले आणि धर्मशाळेत आणायला सांगितले. त्यानंतर तिघांनी जेवण केले. त्या गाडीवाल्याची खात्री पटली की, श्री साटम महाराजांनी त्याच्यासमोर साधूरूपात विठ्ठालाने दर्शन दिले.

  2. चमत्कार आपल्या भक्तांना निराश न करण्यासाठी

    एकदा महाराजांना भेटायला आलेल्या १५ माणसांसाठी बाळूने स्वयंपाक केला. परंतु आणखी लोक महाराजांना भेटावयास येत गेली आणि शेवटी जवळ जवळ १०० माणसे झाली. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे श्री महाराजांनी बाळूला जेवण वाढावयास सांगितले. बाळूला प्रश्र्न पडला की, १५ माणसांसाठी केलेला स्वयंपाक १०० माणसांना कसा पुरणार. बाळूने ही गोष्ट महाराजांना सांगितली नाही. त्याने फक्त प्रार्थना केली की, ह्या परिस्थितीत त्याला काहितरी मार्ग मिळू दे आणि त्याने स्वयंपाकावर महाराजांचे एक वस्त्र झाकले. त्याने जेव्हा वाढायला घेतले तेव्हा त्याला भांडे जास्त जड लागले. प्रार्थना करत तो वाढतच गेला. त्याच्या लक्षात आले की, जेवण संपत नाही. सर्वांना वाढून झाल्यावर देखील थोडे जेवण उरले.

  3. चमत्कार ज्यातून महाराजांचे आध्यात्मिक शक्ती दिसते

    जीवनाचा अंत जवळ येत असताना श्री साटम महाराजांनी अन्न घेणे जवळ जवळ बंद केले होते. भक्तांना खूप चिंता वाटू लागली. त्यांनी महाराजांना तपासायला डॉक्टर बोलाविला. जेव्हा डॉक्टरांनी येऊन तपासले तेव्हा त्यांना नाडी बंद झालेली आढळली. नाडी बंद असून देखील महाराज जिवंत आहेत हा चमत्कार डॉक्टरने अनुभवला आणि स्वत:ला भाग्यवान मानून तेथून निघून गेला. काही दिवसांनी आणखी एक डॉक्टरला बोलावले त्यावेळी महाराज अजिबात हालचाल करत नव्हते. डॉक्टरांनी त्यांना तपासले व मृत घोषीत केले. त्या क्षणी महाराजांनी डोळे उघडले. असे दोनदा घडले व शेवटी महाराजांनी स्वेच्छेने शरीराचा त्याग केला.

  4. चमत्कार मुलांबद्दल करुणा दाखविण्यासाठी

    महादेव शास्त्री जोशी हे श्री साटम महाराजांचे भक्त होते. एकदा ते महाराजांकडे आपल्या मुक्या व बहिऱ्या मुलाला घेऊन आले. तो मुलगा जन्मापासूनच मुका बहिरा होता. ज्यावेळी जोशी दर्शनाकरीता पोहोचले त्यावेळी महाराज आपल्या भक्तांसोबत भजन म्हणत होते. जोशींनी आपल्या मुलाला महाराजांच्या पायावर ठेऊन सर्व हकीकत सांगितली. महाराज लगेच उठून नाचू आणि गाऊ लागले आणि आश्र्चर्य म्हणजे जोशींचा मुलगा देखील नाचू आणि गाऊ लागला. जोशींना इतका आनंद झाला की, आनंदाश्रु गाळत ते महाराजांच्या पायाजवळ पडले.

  5. चमत्कार जुनाट पद्धतीच्या उपचाराच्या शक्तीचा

    गजानन वैंगणकर हे महाराजांचे इतके मोठे भक्त होते की, बऱ्याचदा महाराज त्यांच्या घरी देखील जायचे. गरोदरपणात गजाननच्या बायकोला काहीतरी आजार झाला. तो बऱ्याच औषधोपचारांनंतर देखील बरा होत नव्हता. जरी तो महाराजांच्या भक्त होता, तरी त्याने ही गोष्ट महाराजांना कधीच सांगितली नाही. त्याच्या शुभचिंतकांच्या सांगण्याकडे त्याने दुर्लक्ष केले. तो म्हणायचा की महाराजांना सगळे माहित आहे आणि त्याच्या बायकोचे दुखणे त्यांच्या नजरेस आणून देण्याची आवश्यकता नव्हती. पण त्याच्या शुभचिंतकांना ते पटत नव्हते आणि आतुरतेने जाऊन त्यांनी महाराजांना ही गोष्ट दाणोलीला गेले असतांना सांगितली. गजाननच्या मित्रांचे म्हणणे ऐकून महाराज त्यांना म्हणाले की, त्यांनी आधीच गजाननच्या बायकोला बरे केले आहे आणि दुसऱ्या दिवशी ते स्वत: त्याच्या घरी जाणार आहेत. दुसऱ्या दिवशी गजाननच्या घरी पोहोचल्या बरोबर महाराजांनी एक ग्लास भरून बीट मागवले व ते गजाननच्या बायकोच्या तोंडात ओतले. ते म्हणाले की हा एकच उपाय होता तीला बरे करायला. सर्वांना हे पाहून धक्का बसला परंतु गजाननच्या बायकोचा आजार पूर्ण बरा झाला.

    श्री सद्गुरू साटम महाराजांनी २८ मार्च १९३७ रोजी आपल्या शरीराचा त्याग केला. ते सर्वांना सांगून गेले फळ त्याला मिळेल जो देवाची भक्ती करेल. त्यांनी कधी म्हटले नाही की ते मनुष्याकरीता काहीतरी चांगले करीत आहेत. त्यांनी नेहमी म्हटले की देव त्यांचा सांभाळ करतो त्याला प्रेमाने आणि पूर्ण श्रद्धेने पुजतात. त्यांनी म्हटले की, मी तुला कधी सोडून कुठेही गेलोे नाही आहे. मी कायम तुझ्या सोबत आहे. मला प्रेमाने हाक दे आणि मी त्याला उत्तर देईन.

    मला केवळ श्री साटम महाराज दत्तगुरू ह्या नामस्मरणाने आठव कारण मी नावात आहे, शरीरात नाही.


मागे

वर